भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना आपण १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
हिंदु धर्मानुसार अस म्हणल जात की जो व्यक्ति "वरील बारा ज्योर्तिलिंगाचे नावानुरुप मंत्र" जर दररोज पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्मातील झालेला पाप ज्योर्तिलिंगाच्या स्मरणामुळे / जप केल्यामुळे सर्व पापांचा विनाश होतो.
- सोमनाथ (गुजराथ - वेरावळ)
- मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
- महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
- ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर)
- वैजनाथ (महाराष्ट्र - परळी)
- भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर)
- रामेश्वर (तामिळनाडु - रामेश्वर)
- नागेश्वर (महाराष्ट्र - औंढा नागनाथ)
- विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
- त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर)
- केदारनाथ (उत्तरांचल - केदारनाथ)
- घृष्णेश्वर (महाराष्ट्र - औरंगाबाद)
चित्रदालन
edit-
बारा ज्योतिर्लिंगे नकाशा
-
श्री शैल्य मंदिर गोपुर
-
घृष्णेश्वर मंदिर, औरंगाबाद
-
उज्जैन महाकालेश्वर