श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. याचा उच्चार श्री सैल्यम असाही केला जातो. हैद्राबाद पासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले श्री मल्लिकार्जुन (शिव) तिर्थक्षेत्र आहे. समुद्र सपाटी पासून उंची ४७६ मिटर्स आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या काठावर आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मीती केंद्र आहे.
कथा
editयेथे पुर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदी वर प्रसन्न होउन मल्लीकार्जुन आणि ब्रम्हरंभा रुपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले.
इतिहास
editश्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळा पर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा प्रोलयाने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला. या नंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपुर आणि सलुमंतापस व इतर भागाचे निर्माण कार्य केले. इ.स १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विज मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले.