रामेश्वरम (मराठी लेखनभेद: रामेश्वर ; तमिळ: இராமேஸ்வரம் ;) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावरील एक शिवमंदिर आहे. हिंदू मान्यतांनुसार रामाने रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी शंकराची आराधना केली. हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
बाह्य दुवे
edit- https://web.archive.org/web/20170718111035/http://www.rameswaramtemple.org/ रामनाथस्वामी मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ