इन्क्युबेटर:बद्दल
विकिपीडिया इन्क्युबेटर काय आहे?
- विकिपीडिया इन्क्युबेटर ज्याची स्थापना २ जुन २००६ रोजी झाली,एक विकि-आधारीत संकेतस्थळ आहे,ज्याचे यजमानत्व विकिमिडिया फाउंडेशन ईन्का. कडे आहे,
आपला स्वतःचा विकि सुरू करा!
इन्क्युबेटर एक मंच आहे जेथे कोणीही एखाद्या विकिमिडिया प्रकल्पासाठी(विकिपीडिया,विक्शनरी,विकिबुक्स्,विकिन्यूज्,विकिक्वोट व विकिपर्यटन) एका विशिष्ट भाषेच्या आवृत्तीसाठी समाजबांधणी करु शकते,ज्याचे अद्याप स्वतःचे उप-अधिक्षेत्र(सबडोमेन)नाही,जर त्याची भाषा ही अधिकृत भाषा असेल तर.इन्क्युबेटरवरचे हे तथाकथित " चाचणी विकि" इतर दुसऱ्या विकिसारखे वापरता येतात. जेंव्हा त्या समाजास वाटेल तेंव्हा त्यास आपल्या स्वतःच्या उप-अधिक्षेत्रात नविन भाषेसाठी विनंती मार्फत त्यास हलविण्याची विनंती करु शकता.याचा निर्णय भाषा समितीतर्फे घेतला जातो.
- विकिव्हर्सिटी व विकिस्रोत हे वेगळ्या विकिवर आहेत:अनुक्रमे beta.wikiversity.org व wikisource.org.
- विकिमिडिया इन्क्युबेटर हा अनन्य आहे, या अर्थाने कि तो खऱ्या आशयाचा विकिपीडिया मुक्त ज्ञानकोषासारखा प्रकल्प नाही,किंवा, न ही तो मेटा-विकि सारखा संघटनात्मक प्रकल्प आहे, जो,विविध विकिमिडिया प्रकल्पांचे सुसूत्रीकरण करतो.
- वाचतांना, वापरतांना किंवा इन्क्युबेटर मध्ये योगदान करतांना, कृपया गुप्तता नीती व सामान्य उत्तरदायित्वास नकार ही पाने वाचा.
- जर आपणास इन्क्युबेटरच्या अंतर्गत कार्यशैलीबद्दल जाणून घ्यायचे आहे तर,आपण
साहाय्य:एफएक्यू येथे आमचे नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न वाचू शकता. दुसऱ्या प्रकारचे साहाय्य साहाय्य:आशय येथे आहे.
विकिमिडिया इन्क्युबेटर काय नाही?
- जरी, बंद झालेले अधिक्षेत्र हे बहुदा इन्क्युबेटरवर हलविले जातात कारण,ते एखाद्या समाजाची बांधणी करु शकतात,इन्क्युबेटर हा कचरा टाकण्याची जागा नाही, जो ओसाड झालेल्या प्रकल्पांचे यजमानत्व स्वीकारेल.
- जरी इन्क्युबेटर हा विशेष प्रकल्प आहे,त्यास "पडद्यामागचा" प्रकल्प म्हणून मानण्यात येऊ नये.