Wy/mr/भंडारदरा

< Wy‎ | mrWy > mr > भंडारदरा

भंडारदरा धरण हे अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर बांधलेले आहे.

भंडारदरा धरणाची भिंत

बांधकामEdit

शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारद-याचा हा प्रचंड जलाशय तयार झालेला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. ब्रिटिश काळात ९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ तो एप्रिल १९१० मध्ये झाला. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते. नोव्हेंबर १९२० मध्ये धरणात २०० फुट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. जून १९२६ मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी खर्च १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपयेझाला होता. १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक उदघाटन झाले. धरणाला विल्सन डॅम असे नाव दिले गेले.

कसे जालEdit

  • भंडारदरा मुंबईहून २८५ किमीवर आहे. अकोले पासून रस्त्याने ४५ किमी आहे. पुण्याहून संगमनेरमार्गे १८५ किमीवर आहे.
  • रेल्वेने- इगतपुरी येथील रेल्वे स्टेशनपासून ४८ किमी वर आहे.
  • विमान- आतंराष्ट्रीय विमानतळ मुंबईपासून रस्त्याने २८५ किमी आहे.

राहण्याची व्यवस्थाEdit

  • महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे रेस्टहाऊसमध्ये विविध रुम उपलब्ध आहेत.

पुढेEdit

संदर्भEdit

सह्यगिरी संकेतस्थळावरील मजकूर