Wy/mr/चांदबिबिचा महाल

< Wy‎ | mr
Wy > mr > आशिया > चांदबिबिचा महाल

चांदबिबिचा महालअहमदनगर शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी एक अष्टकोनी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल. त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. इमारतीच्या भिंतींना तिरप्या फटी असल्याने दिवसभर या इमारतीत सूर्याची किरणे पोचतात. सलाबतखाने इ.स. १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला.

अहमदनगर येथील चांदबिबिचा महाल

लोक गैरसमजुतीने या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी ही दुसऱ्या सलाबतखानाची कबर आहे. हा सलाबतखान हा इसवी सनाच्या १५५५ मध्ये गादीवर आलेला चौथा निजाम, मूर्तजा याचा वजीर होता.

कसे यालEdit

अहमदनगर गाव पुणे-औरंगाबाद राज्य महामार्गावर असून चांदबिबिचा महाल अहमदनगरहून पाथर्डीकडे जाताना कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर अहमदनगरपासून १० किलोमीटर पूर्वेला आहे. चांदबिबिचा महालववर जाण्यासाठी अहमदनगर मधून बसेस, रीक्षा, खाजगी वाहने उपलब्ध आहेत.

पुढेEdit