अहमदनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे ठिकाण असून याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. पुण्यापासून अहमदनगर १२० किलोमीटर अंतरावर असून पुणे-औरंगाबाद महामार्गावरील या ठिकाणी भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. अहमदनगरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे व समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.
कसे याल
editआल्यावर
editपाहा
edit- भूईकोट किल्ला - इ.स. १९४२ मध्ये येथे भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेव्हा त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक लिहिले.
- ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय -
- रणगाडा संग्रहालय -
- सारे जहान से अच्छा (पेन्सील चित्र) - अहमदनगर चे प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांनी भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे ६५ फुट X १७ फुट अशा एका मोठ्ठ्या भिंतीवर काढली आहेत. केवळ पेन्सिलीच्या सहाय्याने इ.स. १९९७ साली काही महिन्यामध्ये त्यांनी हे जगातील सर्वांत मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केले.
- रेणुकामाता मंदिर (केडगांव) - हे मंदिर केडगाव येथे आहे. ते अहमदनगर रेल्वेस्थानकापासून साधारणपणे ३ किलोमीटरवर आणि अहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे.
- फराहबक्ष महाल
मुक्काम
edit- हॉटेल यश पॅलेस, सक्कर चौक
- हॉटेल संकेत, सक्कर चौक
- हॉटेल प्रेमदान, प्रेमदान चौक
- हॉटेल ओबेरॉय, सावेडी
पुढे
edit