Template:Wy/mr/अलाहाबाद
अलाहाबाद — येथे बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर महाकुंभमेळा भरतो आहे. मकरसंक्रांतीपासून ४५ दिवस प्रयागतीर्थावर (अलाहाबाद येथील त्रिवेणी संगमावर) ४५ दिवसांच्या कुंभमेळ्याच्या यात्रेचा आरंभ होत आहे. कुंभातील पहिला स्नान १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतला सुरू होणार असून २७ जानेवारी २०१३ पौष पौर्णिमा, ०६ फेब्रुवारी २०१३ एकादशी, १० फेब्रुवारी २०१३ मौनी अमावस्या, १५ फेब्रुवारी २०१३ वसंत पंचमी, १७ फेब्रुवारी २०१३ रथसप्तमी,१८ फेब्रुवारी २०१३ भीष्म एकादशी, २५ फेब्रुवारी २०१३ माघ पौर्णिमा, १० मार्च २०१३ महाशिवरात्री- विशेष शाही स्नानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर कुंभमेळ्याचा समारोप केला जाईल.